सध्या कारण नसताना चिडचिड, mood swings, impatience वाढले आहे का?गोष्ट हातात आली असताना अचानक निसटल्यासारखं वाटतंय का? माझ्याच बाबतीत का घडत आहे हा विचार वारंवार येत आहे का??? … तर हे फक्त #तुमच्यासोबतच होत नाही… तर सगळ्यांना तसेच वाटत आहे…. कारण सध्या #ग्रहस्थितीच अशी आहे.
सध्या आकाशात बरीच उलथापालथ सुरू आहे.
मंगळ-राहूचा अंगारक योग जवळजवळ शिखरावर पोहोचला आहे.
त्याचवेळी मंगळ, बुध आणि शनिदेव अस्तंगत झाले आहेत, तर बुध आणि गुरु वक्री आहेत.
या सर्व ग्रहस्थितीमुळे सध्या अनेकांना थोडे सैरभैर, अस्थिर किंवा emotionally disturbed वाटू शकते.
चिडचिड वाढणे
Mood swings
Impulsive reactions
संयम कमी होणे (शनि अस्त असल्यामुळे)
असं वाटू शकतं की काही गोष्टी हातातून निसटून चालल्या आहेत.
शारीरिक स्तरावरही काहींना हे जाणवू शकते…
जुने आजार किंवा त्रास पुन्हा डोकं वर काढणे,
हार्मोन्स संबंधित त्रास वाढणे,
पचन मंदावणे किंवा अपचनाशी संबंधित समस्या.
अंगारक योग शरीरातील #पित्त वाढवतो, त्यामुळे सात्विक आहार घ्या आणि पाणी भरपूर प्या…
विशेष काळजी (१७ मार्चपर्यंत)
१७ मार्चपर्यंत अंगारक योगाचे परिणाम तीव्र असू शकतात.
यानंतर हळूहळू ऊर्जा सौम्य होईल आणि मानसिक स्थिरता परत येऊ लागेल.
तोपर्यंत —
बोलताना संयम ठेवा
रागात किंवा ego मध्ये येऊन निर्णय घेऊ नका
impulsive reactions टाळा
वाहन चालवताना विशेष काळजी घ्या
अंगारक योगाच्या काळात अपघात किंवा आगीशी संबंधित घटनांची शक्यता वाढते, त्यामुळे घाईगडबडीत वाहन चालवणे टाळा.
Career & Job Energy
मार्च महिन्यात अनेक कंपन्यांमध्ये Annual increments आणि promotions होतात.काहींना असं वाटू शकतं की मनासारखी increment मिळाली नाही,…प्रमोशन मिळेल असं वाटत असतानाच गोष्ट हातातून निसटली.अशा वेळी management शी वाद घालणे, impulsive resign करणे, किंवा अचानक career change करण्याचा निर्णय घेणे टाळा…
हा काळ आहे #Wait and Watch….
मोठे career decisions, job switch किंवा financial decisions थोडे पुढे ढकला…
Relationships & Communication
या काळात नात्यांमध्येही गैरसमज निर्माण होऊ शकतात.
जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा
घरातील मोठ्या व्यक्तींशी संवाद साधताना जुने मुद्दे उकरून काढू नका
unnecessary arguments टाळा
कधी कधी #मौन हेच सर्वात मोठं उत्तर असतं.
जितकं unnecessary communication टाळाल तितके वाद कमी होतील.
#छोटे उपाय (Remedies)
राग आणि अस्थिरता कमी करण्यासाठी प्राणायाम किंवा meditation करा.
हनुमान चालीसा पठण करणे फायदेशीर ठरेल.
शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला दिवा लावा.
आणि वर्षाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे
या वर्षी सर्व राशींनी, मूल्यांक-भाग्यांक कोणताही असो
श्रीरामरक्षा स्तोत्र तिन्ही सांजेला घरात मोठ्याने म्हणणे अत्यंत शुभ आणि संरक्षणदायी ठरेल…
लक्षात ठेवा …ग्रहांची ऊर्जा #कायमची नसते.
संयम ठेवणारे आणि शांत राहणारे लोकच या काळातून अधिक मजबूत बनून बाहेर पडतात.
सध्या सर्व राशींसाठी एकच मंत्र — #Wait and Watch..